ताजे अपडेट

सत्ता नव्हे तर सेवा – पाचर्णे साहेबांच्या विचारांची वारसदार म्हणून मालतीताईंची वाटचाल

 

शिरूर प्रतिनिधी

शिरूर–न्हावरे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालतीताई बाबुराव पाचर्णे यांनी भावनिक शब्दांत स्वर्गीय माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांना अभिवादन करत आपल्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली आहे.
“साहेब, आज मी तुमच्या स्मृतीसमोर उभी आहे. तुम्ही आयुष्यभर सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केलं. तुमचं अपूर्ण राहिलेलं काम पुढे नेणं हीच माझी जबाबदारी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले.

 

 

स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे हे जनतेच्या हृदयात घर करून राहिलेले नेतृत्व होते. सत्ता, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा लोकांचा विश्वास आणि सेवाभाव त्यांनी नेहमी जपला. गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
मालतीताई पाचर्णे या त्यांच्या विचारांचीच वारसदार असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. “तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं काम आणि लोकांचा विश्वास जपणं हेच माझं अंतिम ध्येय आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळेच मला उभं राहण्याचं बळ मिळालं आहे,” असे सांगत त्यांनी भावनिक ऋण व्यक्त केले.

“सत्ता नाही तर सेवा” हा विचार डोळ्यांसमोर ठेवूनच आपण पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ही लढाई वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे साहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्णत्व देण्यासाठी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आजही स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांची आठवण योग्य मार्ग दाखवत असल्याचा विश्वास व्यक्त करत, “तुम्ही माझ्या नेहमी सोबत आहात, हा माझा ठाम विश्वास आहे. तुमच्या विचारांच्या आणि समर्थनासाठीच मी मैदानात उतरले आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी उच्चारले.

शिरूर–न्हावरे जिल्हा परिषद गटात मालतीताई पाचर्णे यांच्या उमेदवारीकडे सेवा, संस्कार आणि सातत्य यांचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. पाचर्णे साहेबांच्या कार्याची जाणीव ठेवत, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल अनेकांच्या मनाला भावून गेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका