ताजे अपडेट

होणेवाडीत बैलपोळा उत्साहात साजरा

युवा नेते विकासशेठ खाडे मित्र परिवाराचा पुढाकार; वाजंत्रीच्या तालावर तरुणाईचा ठेका

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी येथील जागतिक कुंड पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होणेवाडी येथे युवा नेते विकासशेठ खाडे मित्र परिवाराच्या वतीने बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शेती व्यवसायात दिवसभर राबणाऱ्या बळीराजाच्या जिवाभावाच्या सवंगड्यांचा सन्मान करण्यासाठी बैलांना आकर्षक सजावट करून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.या उत्सवामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टाकळी हाजी परिसरात भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे.शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांना मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतो. यानिमित्ताने बैलांना सजवून, त्यांची पूजा करून आणि वाजतगाजत मिरवणूक काढून हा सण साजरा करण्यात आला.

या वेळी सोमनाथ साठे यांच्या वाजंत्री ताफ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वाजंत्रीच्या तालावर तरुणाईसह अनेकांनी ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला.सजविलेल्या बैलांसमोर वाजतगाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे उत्सवाची रंगत आणखी वाढली.पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या बैलपोळ्याने ग्रामीण संस्कृती आणि शेतकरी जीवनातील बैलांचे महत्त्व अधोरेखित केले. या उत्सवाला बैलगाडामालक भाऊ दत्तू घोडे, राजेंद्र गावडे, भाऊ मुंजाळ, मंगेश पवार, संजय घोडे, लहू घोडे, सतीश घोडे, सोमनाथ घोडे, राहुल खाडे, दीपक घोडे, रमेश पवार, दीपक गावडे, सोमनाथ पवार, विजय पवार, अजिंक्य पवार, हर्षल घोडे, अमोल घोडे यांच्यासह होणेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका