“निमोण्यात ‘पैठणी महासंग्राम’ची धूम, बक्षिसांची बरसात!”
झी मराठी प्रस्तुत पैठणीचा महासंग्राम
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील निमोणे येथे महिलांसाठी खास आकर्षण असलेला झी मराठी प्रस्तुत पैठणीचा महासंग्राम “ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणत मनोरंजनासोबत पारंपरिक संस्कृतीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता हनुमान मंदिर, निमोणे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे करण्यात आले आहे. “रंगणार पैठणीचा डाव, सज्ज आहे का तुमचं गाव?” या आकर्षक घोषवाक्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना विविध खेळ, स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसांची संधी मिळणार असून विजेत्यांना पैठणीसारखे खास पारितोषिक देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे गावागावातील महिलांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून सामाजिक एकोपाही वाढणार आहे. तसेच हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सहभागाची भावना निर्माण करणारा ठरणार आहे.
परिसरातील महिला वर्ग तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नम्रता रवीबापू काळे तसेच सारिका संतोष जाधव सरपंच निमोणे यांनी केले आहे