ताजे अपडेट

उचाळेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

विद्यार्थ्यांनी केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर मिळवले मानाचे स्थान

टाकळी हाजी (प्रतिनिधी)

“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास” हे ब्रीद जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळेवस्ती शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्र, तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर मानाचे क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.इयत्ता पहिलीतील अन्वय सुजाता योगेश उचाळे याने १२० गुण मिळवत टाकळी हाजी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शिरूर तालुक्यात सहावा, पुणे जिल्ह्यात अकरावा आणि महाराष्ट्र राज्यात सोळावा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले.

त्यांना वर्गशिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे यांचे मार्गदर्शन लाभले.इयत्ता चौथीतील प्रणस्वी पल्लवी विलास साबळे हिने २४८ गुण मिळवत टाकळी हाजी केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. तसेच शिरूर तालुक्यात १७ वा, पुणे जिल्ह्यात २२ वा आणि महाराष्ट्र राज्यात ४३ वा क्रमांक मिळवला तिला वर्गशिक्षिका मंदा कैलास सोदक यांचे मार्गदर्शन लाभले.इयत्ता पाचवीतील स्वरा सोनाली सोमनाथ साबळे हिने २१४ गुण मिळवत टाकळी हाजी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शिरूर तालुक्यात ३३ वा, पुणे जिल्ह्यात ३८ वा आणि महाराष्ट्र राज्यात ४३ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तिला वर्गशिक्षक बाळासाहेब दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ.प्रितम कोकणे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख महादेव बाजारे,मुख्याध्यापक बाळासाहेब दरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या सुनीता कड, सरपंच अरुणा घोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास जायकर, उपाध्यक्ष विलास साबळे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे व सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका