मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगणक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; शिक्रापूरच्या सुधीर मुळे यांचा सन्मान
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
संगणक शिक्षण क्षेत्रात सातत्याने दर्जेदार व विद्यार्थीकेंद्रित कार्य करणारे सुधीर मुळे (ASN कॉम्प्युटर, शिक्रापूर) यांचा मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे महाराष्ट्राचे Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

संगणक शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये प्राप्त व्हावीत आणि डिजिटल युगाशी जोडले जावे, या उद्देशाने सुधीर मुळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधीर मुळे म्हणाले, “मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, हा पुरस्कार माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. यापुढेही अधिक समर्पित भावनेने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि संगणक शिक्षणाच्या प्रसारासाठी कार्य करत राहीन.”
या सन्मानानंतर शिक्रापूर परिसरातील विद्यार्थी, पालक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतून सुधीर मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा हा गौरव संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे