उरळगाव शाळेच्या स्नेहसंमेलनात आदर्श शिक्षकांचा सत्कार
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव
शिरूर (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरळगाव (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक दिपक अबनावे तसेच आदर्श शिक्षिका शुभांगी अबनावे, संभाजी सरड आणि वर्षा बोरुडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा गव्हाणे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच स्वप्नील गिरमकर, युवा कार्यकर्ते कानीफ गव्हाणे, राजेंद्र गिरमकर, भाऊसाहेब कोकडे, सागर कोळपे,माजी चेअरमन संजय जांभळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुकाराम गिरमकर, माजी चेअरमन संतोषकाका सात्रस, ज्येष्ठ शिक्षक दशरथ आफळे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बांडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता नवले, उपाध्यक्ष कादिरभाई शेख, मोहन सात्रस शशिकांत कोकडे, द्वारका ओव्हाळ राणीताई बांडे, गजानन जांभळकर, निलेश सात्रस, अविनाश सात्रस यांच्यासह ग्रामस्थ, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षक घेत असलेल्या परिश्रमांची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका आणि वेशभूषा सादरीकरण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपले कलागुण सादर केले. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक अबनावे यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी सरड यांनी केले. मान्यवरांचे स्वागत भाऊसाहेब कोकडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सागर कोळपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.