लोहार युथ फाऊंडेशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय थोरात; विजयराव लोखंडे राज्य कार्यकारिणीवर
- पुणे (प्रतिनिधी): श्री.क्षेत्र आळंदी येथे विश्वकर्मा लोहार धर्मशाळा सभागृहात लोहार युथ फाऊंडेशनच्या पुणे जिल्हास्तरीय वार्षिक कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पत्रकार विजयराव ज्ञानेश्वर लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर संचालकपदी बढती झाल्यानंतर रिक्त झालेल्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विजय अशोक थोरात यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

मेळाव्याची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा व विविध शहर कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्हास्तरीय ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’, वर्षाअखेरीस ‘लोहार बिझनेस समिट–२०२६’ आणि ‘वधू-वर संवाद मेळावा’ आयोजित करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर प्रकाश सोनवणे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय अशोक थोरात यांच्या नावाची घोषणा करताना, संघटनेच्या विस्तारासाठी नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. लवकरच पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेळाव्यात माजी अध्यक्षा दिपाली विघवे, अध्यक्ष किशोर सोनवणे, कार्याध्यक्ष अजय खंडागळे, उपाध्यक्ष नितेश लोखंडे, सहसचिव दिनेश सोनाळेकर,राज्य कार्यकारिणी संचालक विजयराव लोखंडे, नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष विजय थोरात यांनी संघटन बळकटी, युवकांचा सहभाग, शिक्षण, उद्योजकता आणि सामाजिक एकजुटीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास
हर्षदा सोनवणे, अभिजित पवार, रविंद्र विघवे, सुशील इघे, अतुल गोराने, संदीप पखाले, संतोष चव्हाण, संदीप गाडे, संदीप पवार, मनोज लोखंडे, निलेश पवार, अमोल टाकसाळ, राहुल लोखंडे, अवधूत हरिहर, सागर थोरात, महेंद्र लोखंडे, अक्षय पवार, योगेश चाफेकर, स्वनील थोरात, रविंद्र आंबेकर, सोमनाथ लोखंडे, रविंद्र हरिहर, सोमनाथ पोपळघट, अनिल पोपळघट, अभिजित लोहार, एकनाथ थोरात, ऋषिकेश पडघन, तुषार पडघन, नवनाथ थोरात, अविनाश विघवे, रोहित पवार, जितेंद्र पडघन, बाबासाहेब जवणे, अतुल लोहार, सी. जी. लोहार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी विश्वकर्मा लोहार धर्मशाळा समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात, बाळासाहेब थोरात आणि किसन बलांसे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
“विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची तयारी सुरू”- एलवायएफतर्फे ऑगस्ट महिन्यात भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात पुणे जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शनपर कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, पुणे जिल्ह्यातील लोहार समाजासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.