ताजे अपडेट

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मनिषाताई पाचुंदकर यांची निवड; लोहार युथ फाऊंडेशनकडून शुभेच्छा

शिरूर (प्रतिनिधी) : रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मनिषाताई गणेशदादा पाचुंदकर यांची निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामविकास व जनहिताच्या दृष्टीने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

 

या निवडीबद्दल लोहार युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितेशदादा लोखंडे यांनी सौ.मनिषाताई पाचुंदकर यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करत शुभेच्छा दिल्या,तसेच लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीनेही त्यांचा सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी बोलताना नितेशदादा लोखंडे यांनी, “रांजणगाव गणपतीच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सौ. मनिषाताई पाचुंदकर यांचे नेतृत्व निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.

विशेष म्हणजे गणेशदादा पाचुंदकर आणि नितेशदादा लोखंडे यांची अनेक वर्षांपासून अतिशय जिवलग मैत्री असून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये दोघेही एकत्रितपणे कार्यरत आहेत. या मैत्रीच्या नात्यातूनच ही सदिच्छा भेट अधिक भावनिक व प्रेरणादायी ठरली.सौ.मनिषाताई पाचुंदकर यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला असून विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ.मनिषाताई गणेशदादा पाचुंदकर यांचा लोहार युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितेशदादा लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका