ताजे अपडेट

ताशा किंग सिराजभाई मनियार यांना ‘कलावंत दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरव

*शिवजयंती सोहळ्यात दिमाखात सन्मान; गिरीश राजूरकर व त्यांच्या टीमचे परिश्रम ठरले यशस्वी*

शिरूर प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड | दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रसिद्ध ताशा किंग सिराजभाई मनियार यांना ‘कलावंत दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिमाखदार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रातील १७० कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये सिराज भाई मनियार यांच्या ताशा वादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
सिराज भाई मनियार यांनी राज्यभरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या ताशा वादनाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक ताशा वादनाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे.
या भव्य सोहळ्याचे नेतृत्व गिरीश सुदास राजूरकर (अध्यक्ष) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे, खजिनदार सिद्धार्थ शिंदे तसेच स्वराज्य फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीमने परिश्रमपूर्वक नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. आयोजनातील शिस्तबद्धता, आकर्षक नियोजन आणि कलाकारांना दिलेला सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
उपस्थित मान्यवरांमध्ये असिस्टंट टू पोलीस कमिशनर सुनील हिरुरकर, एअर फोर्स टेक्निकल ऑफिसर सुरेश पोखरकर, ‘स्टार माझा’चे डायरेक्टर राहुल शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री काजल शिंदे तसेच निर्माता-दिग्दर्शक बाळासाहेब बांगर यांचा समावेश होता.
टाळ्यांच्या कडकडाटात झालेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. शेवटी गिरीश राजूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका