ताजे अपडेट

पेण तालुक्यात महाशिवरात्री निमित्त ‘तुकोबा’ नाटकाचा प्रभावी प्रयोग

दुरशेत गावची सांस्कृतिक परंपरा उजळली

पेण (प्रतिनिधी)


रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दुरशेत या गावात महाशिवरात्री निमित्तदुरशेत गावची सांस्कृतिक परंपरा उजळली

दरवर्षीप्रमाणे यंदाही नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. गावातील सर्व तरुण-तरुणी एकत्र येऊन तब्बल तीन महिने सराव करून सादर केलेल्या “तुकोबा” या तीन अंकी नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या या गावाने यंदा संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित कथानक रंगमंचावर साकारत सांस्कृतिक जिवंतपणा दाखवून दिला.
युवा नाट्य प्रबोधिनी, दुरशेत प्रस्तुत या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन उदय गावंड यांनी केले असून नेपथ्याची जबाबदारी राजा जोशी यांनी सांभाळली. संगीत संदेश डंगर, रंगभूषा राजेश चव्हाण तर सेट व प्रकाशयोजना किरण फुलारी यांनी प्रभावीपणे साकारली.
नाटकातील भूमिका व कलाकारांमध्ये तुकाराम महाराज – संदेश गावड, अवली – पूजा डंगर, रखमा – योगिता डंगर, कान्हा – जगदीश डंगर, संतू – विलास फुलारी, लक्ष्मीदास – संजय गावंड, धर्मपीठप्रमुख – दिनेश गावंड, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत मानव फुलारी यांनी विशेष दाद मिळवली. याशिवाय मावळा – सचिन गावंड, रामेश्वर शास्त्री – धर्मेश गावंड, मंबजी – रामदास डंगर, दिगूभट – जयेश म्हात्रे, कुलकर्णी – नरेश शहासने, बहिणाई – अर्पिता, भिका – शिल्पेश डंगर, उत्तम – दिपेश गावंड, दामाजी – धनाजी डंगर, तसेच बालकलाकार मंजिरी व हार्दिक यांनीही उत्कृष्ट अभिनय सादर केला. इतर कलाकारांनीही रंगमंच गाजवत प्रयोग यशस्वी केला.
विशेष म्हणजे गावातील सर्व कलाकार दिवसभर नोकरी-व्यवसाय सांभाळून सलग तीन महिने नाटकासाठी मेहनत घेतात. गेली अनेक वर्षे ही सांस्कृतिक परंपरा अखंड सुरू ठेवत दुरशेत गावाने स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नाट्यप्रयोगाला भरघोस दाद मिळाली असून गावाच्या सांस्कृतिक ओळखीला नवसंजीवनी मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका