मंथन परीक्षेत टाकळी हाजीची ‘आदिती प्रशांत शिंदे’ ठरली अव्वल तेजस्वी तारा; केंद्रात प्रथम, जिल्ह्यात १३ वा तर राज्यात १८ वा क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम
टाकळी हाजी (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,टाकळी हाजी येथील इयत्ता तिसरीतील कु.आदिती स्वाती प्रशांत अनिल शिंदे हिने मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आदितीने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्तरावर १३ वा तर राज्य स्तरावर १८ वा क्रमांक मिळवून शाळेसह टाकळी हाजी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी इयत्ता दुसरीत असतानाही आदितीने मंथन परीक्षेत राज्यात ८ वा व जिल्ह्यात ३ रा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. केंद्रप्रमुख महादेव बाजारे यांच्या नियोजनाखाली वर्गशिक्षिका मंगल गावडे यांनी तिला मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक रामदास कौठाळे, आदर्श शिक्षिका प्राजक्ता मुळे तसेच अर्जुन पांढरकर यांनी शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन केले.
तिच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटरावजी गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच मोहन चोरे, संत सेना महाराज ट्रस्टचे खजिनदार अनिल शिंदे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष गुगळे, उपाध्यक्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी गावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बारहाते, उपाध्यक्ष रेणुका पवार, शिक्षणतज्ञ विजय थोरात तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
आदितीच्या या यशामुळे टाकळी हाजी परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.