ताजे अपडेट

शिरूरमध्ये अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

नवीन कार्यकारिणीची निवड; शिक्षक हितासाठी संघटनेची भक्कम भूमिका अधोरेखित

शिरूर तालुका (प्रतिनिधी)

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (जागतिक महासंघाशी संलग्न) तसेच अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांचे त्रैवार्षिक अधिवेशन व कार्यकारिणी निवड समारंभ शिरूर येथील हॉटेल संग्राम आणि बँग्वेट हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या अधिवेशनासाठी राज्यसंघटनेचे सरचिटणीस कल्याण लवांडे, संयुक्त चिटणीस राजेंद्र निमसे,नेते शिवाजी वाळके, जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, मार्गदर्शक मोहन थोरात, गंगाराम साकोरे , महिला कॉन्शिल मेंबर व महिला अध्यक्षा साधना खोमणे, राज्य महिला उपाध्यक्षा ललिता साकोरे, राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, जिल्हा सरचिटणीस सुरेश थोरात, शिक्षक पतसंस्थेच्या माजी सभापती शर्मिला निचित, उपसभापती संदीप थोरात, अध्यक्ष अशोक पठारे, महिला आघाडी अध्यक्षा रेश्मा कुरंदळे यांच्यासह तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व इतर तालुक्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन १९१० मध्ये स्व.आर्चाय दादासाहेब दोंदे यांनी लावलेल्या संघटनेच्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.सध्या १४४ देशांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना शिक्षकांच्या हक्कांसाठी देश-विदेशात प्रभावीपणे कार्यरत आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्या, सेवा अटी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी संघटना कटिबद्ध असल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले.

 नवीन कार्यकारिणी जाहीर शिरूर तालुक्यासाठी पुढील पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली 

अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष  विश्वनाथ बेंडाले, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण डहाळे, सरचिटणीस संदीप थोरात, महिला अध्यक्षा सरीता दंडवते, महिला कार्याध्यक्षा सरस्वती गांजे, महिला कोषाध्यक्षा अलका पांढरकर, महिला सरचिटणीस प्राजक्ता मुळे यांची निवड करण्यात आली.

पुढील मासिक सभेत कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येईल अशी माहिती नेते शिवाजी वाळके यांनी दिली.तालुका अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मावळते अध्यक्ष अशोकराव पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे माजी चेअरमन दिवाण विचाटे यांनी केले. सूत्रसंचालन माजी अध्यक्ष अर्जुन निचित यांनी तर आभार प्रदर्शन शिरूर नगरपालिका अध्यक्ष धनंजय जाधव यांनी मानले.अधिवेशनामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका