MOTION NEET च्या MTS परीक्षेत शिंदोडीच्या विद्यालयाची घवघवीत यशस्वी कामगिरी

शिरूर प्रतिनिधी
MOTION NEET (Science Academy) तर्फे शिरूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १८/०१/२०२५ रोजी झालेल्या MTS (Motion Talent Search) परीक्षेत शिरूर तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

कै. हारूबाई उमाजी शितोळे उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शिंदोडी येथील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. विद्यार्थिनी कु. पूजा जालिंदर ढेपे हिने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून ₹७,०००/- शिष्यवृत्ती मिळवली. तसेच कु. दिव्या काशिनाथ चोरामले हिचाही चांगल्या गुणांबद्दल सत्कार करण्यात आला.
शिरूरमधील ४० शाळांपैकी गुणवत्ताधारित ७ शाळांच्या निवडीत कै. हारूबाई उमाजी शितोळे विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ. शेखर गायकवाड (माजी सहकार आयुक्त, पुणे), डॉ. अनिल गुंजाळ (माजी शिक्षण अधिकारी, पुणे), डॉ. सुनील शेळके (तहसीलदार, जुन्नर) व MOTION ACADAMY च्या अध्यक्षा डॉ. मीनल जाधव यांच्या हस्ते विद्यालयास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.
