ताजे अपडेट

पुणे झेडपीच्या तीन सदस्यांना यंदा पहिल्यांदाच मिळणार दोन समित्यांच्या सदस्य पदाची संधी..! 

समिती सदस्यांच्या ८३ जागांसाठी ८० सदस्य : येत्या १६ एप्रिलला समित्यांच्या सदस्यांसाठी निवडणूक 

पुणे (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना यंदा पहिल्यांदाच झेडपीच्या दोन समित्यांवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.कारण झेडपीच्या सर्व समित्यांच्या मिळून एकूण ८३ जागा आहेत. या सदस्य पदासाठी पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतींसह एकूण ८० जण पात्र आहेत. त्यामुळे या ८० जणांना कोणत्या ना कोणत्या समितीचे सदस्यपद मिळणार आहेच.परंतू उर्वरित ३ जागांसाठी या ८० जणांपैकी ३ सदस्यांना अन्य एका समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. हे तीन सदस्य एकाच वेळी दोन समित्यांचे सदस्य होणार असल्याने हे तीन जण लक्की ठरणार आहेत. 

 

 

पुणे जिल्हा परिषदेत एकूण विविध दहा विषय समित्या आहेत. यापैकी सर्वाधिक ११ सदस्य हे समाजकल्याण समितीचे तर, सर्वात कमी म्हणजे केवळ ६ सदस्य हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य आहेत. याशिवाय कृषी समितीत दहा आणि जिल्हा परिषदेत सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी (Standing committee) समितीसह अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशूसंवर्धन आणि महिला आणि बालकल्याण समितीत प्रत्येकी ८ सदस्य असतात. 

 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी व जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती असलेल्या या दोन समित्यांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे चारही सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच उपाध्यक्ष हे अर्थ व नियोजन आणि शिक्षण या दोन समित्यांचे सभापती असतात. बांधकाम समितीचे सभापती हे बांधकाम व आरोग्य, कृषी समितीचे सभापती हेच कृषी आणि पशुसंवर्धन अशा प्रत्येकी दोन समित्यांच्या सभापतीपदी असतात. समाज कल्याण व महिला व बालकल्याण समितीचे सभापती हे आपापल्या विषय समित्यांचे सभापती असतात. 

 

झेडपी पदाधिकारी हे पदसिद्ध सदस्य 

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती हे स्थायी व जलव्यवस्थापन व स्वच्छता या दोन विषय समित्यांचे पदसिद्ध सदस्य असतात.शिवाय उपाध्यक्ष आणि हे अन्य चार सभापती हे आपापल्या विषय समितीचे सभापती असल्याने हे पदाधिकारी अन्य समित्यांचे सदस्य राहू शकत नाहीत. त्यामुळे हे सहा पदाधिकारी समिती सदस्यांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही.

 

समितीनिहाय सदस्य संख्या (समितीचे सभापती वगळून) 

– स्थायी समिती — १३ पैकी ५ पदसिद्ध. 

– जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती -१५ पैकी ९ पदसिद्ध (पदसिद्धमध्ये पाच पदाधिकारी व चार अधिकारी). 

– वित्त व नियोजन — ०८. 

– शिक्षण — ०८. 

– बांधकाम — ०८. 

– आरोग्य — ०८. 

– कृषी — १०. 

– पशूसंवर्धन — ०८.

– समाजकल्याण — ११. 

– महिला व बालकल्याण — ०८.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका