आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आयोजित रांजणगाव गणपती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
शिरूर (प्रतिनिधी)
आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सन २०१७–१८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेह मेळावा बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव गणपती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाबाबत संवाद साधणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि मार्गदर्शनाची देवाणघेवाण घडवून आणणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांना आपले अनुभव मांडण्याची तसेच शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गटशिक्षणाधिकारी शिरूर प्रीतम कोकणे, आयटीसी सीनियर प्रोग्राम मॅनेजर मुनेश सक्सेना, विस्तार अधिकारी शिरूर किसन खोडदे तसेच विस्तार अधिकारी शिरूर बाळकृष्ण कळमकर उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार असून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे.
तसेच या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासाबाबत माहिती देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, कौशल्यविकास आणि करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील वाटचालीसाठी सकारात्मक दिशा मिळण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमाची माहिती प्रोजेक्ट मॅनेजर लता खरात यांनी दिली असून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संबंधित सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.