ताजे अपडेट

केंद्रप्रमुख पात्रता परीक्षेत आदर्श शिक्षक राहुल जाधव यांची दमदार कामगिरी; खेड तालुक्यात प्रथम क्रमांक

रत्नागिरी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख पात्रता परीक्षेत रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिव येथील आदर्श शिक्षक राहुल आनंद जाधव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून या परीक्षेत त्यांनी १५५ गुण मिळवत खेड तालुक्यात प्रथम क्रमांक तर रत्नागिरी जिल्ह्यात १५ वा क्रमांक पटकावला आहे.

 

आदर्श शिक्षक राहुल जाधव यांनी अल्पावधीत मिळवलेले हे यश शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. शालेय जीवनापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती.शिक्षणाबद्दलची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक बांधिलकी यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

सध्या ते रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ते सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात. विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि विविध शैक्षणिक प्रयोगांमुळे त्यांच्या अध्यापनशैलीला विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे.

त्यांच्या या यशामुळे शिव गाव, शाळा परिवार तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे नावलौकिक वाढल्याची भावना व्यक्त केली जात असून भविष्यातही त्यांनी शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगती करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान राहावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका