ताजे अपडेट

“ईश्वरी लंका रोहिदास सोदकची दहावी CBSE परीक्षेत ९३% गुणांची दैदिप्यमान कामगिरी”

(पुणे प्रतिनिधी)

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील कु.ईश्वरी लंका रोहिदास सोदक हिने दहावीच्या CBSE बोर्ड परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय व दैदिप्यमान यश संपादन केले आहे. चिखली,पुणे येथील एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल शाळेची ही गुणवंत विद्यार्थीनी असून तिच्या या यशामुळे केवळ सोदक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण टाकळी हाजी गाव अभिमानाने भारावून गेले.

 

आजच्या स्पर्धात्मक युगात उत्कृष्ट गुण मिळवणे ही मोठी गोष्ट मानली जाते,अशा परिस्थितीत ग्रामीण पार्श्वभूमीतून येत ईश्वरीने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे.सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे अचूक नियोजन, अभ्यासातील शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा उत्तम समन्वय साधत तिने ही यशस्वी झेप घेतली आहे.

ईश्वरी ही लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक विषय समजून घेण्याची तिची सवय, नियमित अभ्यासाची पद्धत आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास यामुळेच तिने या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. केवळ पाठांतरावर भर न देता विषयाची सखोल समज विकसित करण्यावर तिने भर दिला, हे तिच्या यशाचे गमक ठरले.तिच्या या यशामागे आई-वडिलांचे अथक कष्ट आणि मोलाचे मार्गदर्शन आहे. आई सौ.लंका सोदक या शेती व्यवसाय सांभाळत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतात.मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही वडील श्री.रोहिदास सोदक सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोकसांगवी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि मूल्ये ईश्वरीच्या मनात रुजवली.

आई-वडिलांच्या संस्कारातून घडलेली ईश्वरी आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिने अभ्यासात सातत्य ठेवले आणि प्रत्येक अडचणीवर मात करत यशाचा ध्यास घेतला. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतात, याचे जिवंत उदाहरण ईश्वरीने दाखवून दिले आहे.

ईश्वरीच्या या यशामुळे सोदक कुटुंबाचा सन्मान उंचावला असून टाकळी हाजी गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक विद्यार्थी तिच्या यशातून प्रेरणा घेत असून तिची कामगिरी शैक्षणिक क्षेत्रात आदर्श ठरत आहे.

 

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे तसेच सरपंच अरुणा घोडे यांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विविध स्तरांतील मान्यवर, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनीही तिच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका