शिरूर तालुका शिक्षक संघाच्या महिला आघाडी सरचिटणीसपदी प्राजक्ता मुळे यांची निवड
त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची घोषणा; शिक्षक संघटनेला नवे नेतृत्व
शिरूर तालुका (प्रतिनिधी)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (जागतिक महासंघाशी संलग्न) तसेच अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या त्रैवार्षिक अधिवेशन व कार्यकारिणी निवड समारंभ शिरूर येथील हॉटेल संग्राम आणि बँग्वेट हॉल येथे उत्साहात पार पडला. या अधिवेशनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी हाजी येथील आदर्श शिक्षिका सौ.प्राजक्ता मुळे यांची अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकवर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.

अधिवेशनासाठी राज्यसंघटनेचे सरचिटणीस कल्याणजी लवांडे, संयुक्त चिटणीस राजेंद्र निमसे, नेते शिवाजीराव वाळके, जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, मार्गदर्शक मोहनराव थोरात गुरुजी, गंगाराम साकोरे गुरुजी, देशाच्या महिला कॉन्शिल मेंबर व महिला अध्यक्षा साधना खोमणे, राज्य महिला उपाध्यक्षा ललिता साकोरे, राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, जिल्हा सरचिटणीस सुरेश थोरात, शिक्षक पतसंस्थेच्या माजी सभापती शर्मिला निचित, उपसभापती संदीप थोरात, अध्यक्ष अशोक पठारे, महिला आघाडी अध्यक्षा रेश्मा कुरंदळे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे पदाधिकारी अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विश्वनाथ बेंडाले, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण डहाळे, सरचिटणीस संदीप थोरात, महिला अध्यक्षा सरीता दंडवते, कार्याध्यक्षा सरस्वती गांजे, कोषाध्यक्षा अलका पांढरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे माजी चेअरमन दिवाण विचाटे यांनी केले. सूत्रसंचालन माजी अध्यक्ष अर्जुन निचित यांनी केले तर आभार शिरूर नगरपालिका अध्यक्ष धनंजय जाधव यांनी मानले.