माऊली शेळके यांची एच.डी.एफ.सी.बँकेत क्लस्टर हेड पदी पदोन्नती
शिरूर तालुका (प्रतिनिधी)
रांजणगाव गणपती येथील एच.डी.एफ.सी. बँकेतील अधिकारी गेणभाऊ (माऊली) पंडित शेळके यांची क्लस्टर हेडपदी पदोन्नती झाली असून त्यांची रायगड जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सोनेसांगवी गावचे शांत संयमी स्वभाव असलेले माऊली शेळके हे उच्च शिक्षित असून या यशामुळे रांजणगाव गणपती परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

गेणभाऊ शेळके गेल्या दहा वर्षांपासून एच.डी.एफ.सी. बँकेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या बँकिंग कारकिर्दीची सुरुवात रांजणगाव गणपती येथील शाखेत सेल्स ऑफिसर म्हणून केली. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना पुढे प्रमोशन मिळाले आणि रिलेशनशिप मॅनेजर म्हणून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे जबाबदारी देण्यात आली.
टेंभुर्णी येथेही त्यांनी ग्राहक सेवा व बँकिंग व्यवसाय वाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर त्यांची पुन्हा रांजणगाव गणपती येथे बदली झाली. सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत बँक व्यवस्थापनाने त्यांना क्लस्टर हेडपदी पदोन्नती देत रायगड जिल्ह्यात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शेळके यांच्या या यशाबद्द्दल मित्रपरिवार, सहकारी तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.